Achievement of our student Mr. Sharad Patil

            एका छायाचित्रकारासाठी आजही  ग्रामीण भारतात दडून राहिलेल्या शेकडो कथा, तोचतोचपणा येऊ न देता शोधणं आव्हानात्मक ठरतं. भीमथडी जत्रा,पुणे दरवर्षी लाखो लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरते. यावर्षी या फेस्टिव्हल मध्ये "ग्रामीण इंडिया" वर  आधारित छायाचित्र स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या छायाचित्र स्पर्धेत आलेल्या सर्व  छायाचित्राचे प्रदर्शन व "दहा उत्कृष्ट " छायाचित्रे काढण्यात आली. या मध्ये या महाविद्यालयातील बी.ए. भाग – १ मध्ये शिकत असणाऱ्या चंदुरच्या कु.शरद इरगोंडा पाटील याच्या दोन छायाचित्राचा समावेश होता. यातील कोल्हापूरजवळ कॅमेराबद्ध केलेल्या प्रति पंढरपूर नंदवाळ येथील "भक्तीचे प्रांगण,आनंदाचे रिंगण" या छायाचित्रास माजी कृषीमंत्री मा. शरद पवार यांच्या हस्ते पुणे येथे पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. या छायाचित्राची निवड प्रसिद्ध छायाचित्रकार इंद्रजित खंबे यांनी केली. या स्पर्धेसाठी शरदला आई-वडील, बंधू सुधीर पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे व "कोल्हांपुर अमॅच्युअर फोटोग्राफर्स" ग्रुप  चे सहकार्य लाभले.