'Citizens' Charter

 

नागरिकांची सनद (Citizens Charter) 

            आपणास जी माहिती / दस्तऐवज / दाखला हवा आहे त्याचा उल्लेख करून मा. प्राचार्य, दत्ताजीराव कदम आर्ट्स, सायन्स अॅण्ड कॉमर्स कॉलेज, इचलकरंजी यांचे नावाने अर्ज करावा व तो रजिस्ट्रार यांचेकडे जमा करावा. त्यानंतरचा पाठपुरावा संबंधित कर्मचारी किंवा रजिस्ट्रार यांचेकडे करावा.

            दुबार दाखल्यासाठी प्रतिज्ञापत्र आवश्यक, मूळ दाखला हरवला असेल तर पोलिस रिपोर्ट आवश्यक, जर मूळ दाखला अन्य ठिकाणी वापरला असेल तर तसा उल्लेख प्रतिज्ञापत्रात करावा. कामाचे स्वरूप, त्यासाठी लागणारा कालावधी व त्याच्याशी संबंधित माहिती खालीलप्रमाणे,

अ.क्र. कामाचे स्वरूप कामाचे टप्पे सेवा पुरविण्याची विहीत मुदत मुदतीत सेवा न पुरविल्यास तक्रार करावयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचे नाव
१. प्रवेश प्रक्रिया
  1. विद्यार्थांना माहिती पत्रक विक्री करणे.
  2. सर्व कागदपत्रांची छाननी करून प्रवेश यादी तयार करणे व प्रवेश देणे.
निकाल लागलेपासून १० दिवस मा. प्राचार्य
२. टी.सी. देणे अर्ज करण्यास सांगणे, ग्रंथालयातील ड्युज व बाकी फी भरून घेणे. अर्ज केल्यापासून ३ दिवस मा. प्राचार्य
३. बोनाफाईड विहीत फी भरून घेवून अर्ज स्वीकारणे व ओळखपत्रावरून अर्जदाराची खात्री करणे. अर्ज केल्यापासून दुसरा दिवस मा. रजिस्ट्रार
४. एस. टी. कन्सेशन फॉर्म तपासून फोटो साक्षांकन करणे   विद्यार्थांनी केलेल्या विहीत नमुन्यातील एस. टी. पास सवलत अर्जावर सही शिक्का देणे. विहीत नमुन्यातील अर्ज दिल्यापासून त्याच क्षणी. मा. रजिस्ट्रार
५. निकाल पत्रक देणे ओळखपत्र अगर अन्य कागदपत्रांवरून  ओळखीची खात्री करणे. विद्यार्थी कार्यालयात आल्याबरोबर त्याच क्षणी निकाल पत्रक देणे. मा. रजिस्ट्रार