Merit Lists (2020 -2021)

 B.A. - I / B.Sc. - I / B.C.A. - I प्रवेशासंदर्भात महत्वाची सूचना - 

  1. जे विद्यार्थी B.A. - I / B.Sc. - I / B.C.A. - I मध्ये प्रवेश घेऊ इच्छितात व ज्यांनी अद्यापही ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेले नाही अशा विद्यार्थ्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावे  व महाविद्यालयात येऊन आपला प्रवेश दि. ३०-०१-२०२१ पर्यंत निश्चित करावा.
  2. ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केले आहे व अद्यापही आपले प्रवेश घेतलेले नाहीत अशा सर्वांना विना अनुदानित तुकडीतील प्रवेश दि. ३०-०१-२०२१  अखेर सुरु राहतील.
  3. B.A. - I / B.Sc. - I / B.C.A. - I ची ऑनलाईन रजिस्ट्रेशन लिंक सुरु आहे. : Registration Link

महत्वाची टीप : ज्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून अर्ज महाविद्यालयात जमा केलेला आहे तथापि विहित प्रवेश शुल्क जमा करून प्रवेश निश्चित केला नाही अशा विद्यार्थ्यांनी दि. २३ जानेवारी, २०२१ पर्यंत प्रवेश शुल्क भरून आपले प्रवेश निश्चित करावेत. यानंतर प्रवेशाबाबत कोणतीही तक्रार चालणार नाही. दि. २३ जानेवारी, २०२१ नंतर अशा रिक्त झालेल्या जागांवर इच्छुक विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जातील. 

 - प्राचार्य

B.A.-I / B.Com. - I / B.Sc. - I गुणवत्ता यादी (Merit List) मधील विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सूचना 

गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्मची हार्ड कॉपी व खालील आवश्यक कागदपत्रे महाविद्यालयात येऊन सादर करावीत व आपला प्रवेश निश्चित करावा. जे विद्यार्थी दिलेल्या मुदतीत जिस्ट्रेशन फॉर्म व आवश्यक कागदपत्रे महाविद्यालयात येऊन सादर करणार नाहीत अशा विद्यार्थ्यांचे गुणवत्ता यादीतील नाव रद्द होऊन प्रतीक्षा यादीतील (Waiting List) विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी संधी दिली जाईल. याबाबत कोणत्याही प्रकारची सबब / तक्रार विचारात घेतली जाणार नाही.

प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे

  1. ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्मची हार्ड कॉपी
  2. ऑनलाईन रजिस्ट्रेशन फी पावती
  3. १२ वी शाळा सोडल्याचा मूळ दाखला व झेरॉक्स प्रत
  4. १० वी व १२ वी च्या गुणपत्रकाची झेरॉक्स प्रत
  5. मागासवर्गीय असल्यास जातीच्या दाखल्याची झेरॉक्स प्रत
  6. महाराष्ट्र परीक्षा बोर्ड व्यतिरिक्त बोर्ड असल्यास मायग्रेशन सर्टिफिकेटची मूळ प्रत

 B.A. - I / B.Com. - I / B.Sc. - I Merit Lists : Click Here 

 SY / TY (B.A./B.Com./B.Sc.) Merit Lists : Click Here 

 B.A./B.Com./B.Sc. - I Online Fee Payment Reminder Notice - बी. ए. / बी. कॉम. / बी. एस्सी. भाग – १ मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयामध्ये आपला प्रवेश फॉर्म जमा केला आहे, परंतु अद्याप महाविद्यालयाची प्रवेश फी ऑनलाईन भरलेली नाही अशा विद्यार्थ्यांनी आपली प्रवेश फी दि. ३०-०९-२०२० पर्यंत भरावी. अन्यथा आपला प्रवेश रद्द करण्यात येईल याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

B.A./B.Com./B.Sc. - I Online Fee Payment Notice...

बी.ए. भाग - १ च्या १५-०८-२०२० रोजी प्रसिद्ध केलेल्या गुणवत्ता यादी क्र. १ (First Merit List) मधील विद्यार्थ्यांना कळविणेत येते कि, सदर गुणवत्ता यादीमधील विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करणेसाठीची मुदत दि. ३१-०८-२०२० पर्यंत वाढविण्यात आली आहे, तरी संबंधित विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी. 

बी.एस्सी. भाग - १ च्या १५-०८-२०२० रोजी प्रसिद्ध केलेल्या गुणवत्ता यादी क्र. १ (First Merit List) मधील विद्यार्थ्यांना कळविणेत येते कि, सदर गुणवत्ता यादीमधील विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करणेसाठीची मुदत दि. २५-०८-२०२० पर्यंत वाढविण्यात आली आहे, तरी संबंधित विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी.